Friday, March 29, 2024

/

70 पोलीस कोरोना बाधित : बरे झाल्यामुळे 27 जण कामावर रुजू

 belgaum

पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील 70 पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या 2 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. तथापि कोणतीही जीवित हानी झालेली नाही, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिली.

आपल्या कार्यालयांमध्ये मंगळवारी पत्रकारांशी बोलताना पोलीस उपायुक्त आमटे म्हणाले, बेळगाव शहरात पोलिसांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आल्यामुळे सुदैवाने प्राणहानी झालेले नाही. तथापि शहरातील विविध पोलिस ठाण्यांमधील 70 पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या 2 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. या कोरोना बाधितांपैकी आतापर्यंत 30 जण बरे झाले असून त्यापैकी 27 जण कामावर हजर झाले आहेत. त्याचप्रमाणे तिघेजण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेत आहेत. कोरोना बाधित 40 पोलीस आयसोलेशनमध्ये असून त्यांच्यावर नोडल अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहेत.

शहरातील पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण 1400 पोलिसांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. विविध आरोग्य समस्यांमुळे 45 जणांनी अद्याप लस घेतलेली नाही. एकंदर शहर व्यक्तीतील पोलीस दलात 98 टक्के लसीकरण झाले आहे, असेही विक्रम आपटे यांनी स्पष्ट केले. लॉक डाऊनसह सर्व सरकारी आदेशाचे पालन करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. त्यामुळे सकाळी, दुपारी आणि रात्री अशा तीन पाळ्या (शिफ्टस्) केल्या जात आहेत. शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना फेसमास्क, सॅनिटायझर व हॅन्ड ग्लोजचे वाटप करण्यात येत आहे.

 belgaum

लाॅक डाऊन उल्लंघनाबाबत तपास कसा करायचा, अटक कशी करायची, वाहन जप्त करणे व अन्य विषयावरही सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. सर्वांनी फेसमास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. लस घेतली म्हणून दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे पोलीस देखील सर्वती खबरदारी घेत आहेत, असे पोलीस उपायुक्त डॉ. आमटे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.