Saturday, January 18, 2025

/

चक्क व्हिलचेअर वरुन रुग्णाला ढकलत आणले घरी

 belgaum

खाजगी ॲम्ब्युलन्स चालकांनी अव्वाच्या सव्वा दर आकारणी करून लूट चालविली असल्यामुळे ‘आम्हाला कष्ट पडले तर चालतील पण नको ती ॲम्बुलन्स’ असे म्हणत एका जखमीला त्याच्या कुटुंबीयांनी चक्क व्हील चेअरवरून हॉस्पिटलपासून घरापर्यंत ढकलत आणल्याची घटना गोंधळी गल्ली येथे आज सकाळी घडली.

याबाबतची माहिती अशी की, गोंधळी गल्ली येथील अपघाती जखमी झालेल्या गोंधळी गल्ली चारूदत खोत  या इसमाला कॉलेज रोडवरील हॉस्पिटलपासून कोल्हापूर सर्कल येथील डायग्नोसिस सेंटरपर्यंत ने -आण करण्यासाठी खाजगी ॲम्ब्युलन्स चालकाने तब्बल 4 हजार रुपये भाडे सांगितले. कॉलेज रोड ते कोल्हापूर सर्कल या साधारण एक-दीड कि.मी.च्या अंतरासाठी 4 हजार रुपयाची मागणी केल्यामुळे संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांना धक्काच बसला आणि त्यांनी रुग्णाला ऑटो रिक्षांमधून घेऊन जाणे पसंत केले.

त्यानंतर आज संबंधित रुग्णाला कॉलेज रोडवरील हॉस्पिटलमधून घरी गोंधळी गल्ली येथे आणावयाचे होते. तेंव्हा ॲम्ब्युलन्स दराचा धसका घेतलेल्या त्या रुग्णाच्या कुटुंबीयांनी व्हीलचेअरची व्यवस्था केली आणि चक्क त्या व्हीलचेअरवरून रुग्णाला ढकलत घरापर्यंत आणले.Ambulace wheelchair

सदर प्रकाराबद्दल सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनचे संस्थापक -अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी खेद व्यक्त करून बेळगाव लाईव्ह समोर आपली तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणाचाच वचक नसल्यामुळे खाजगी ॲम्बुलन्स चालक रुग्णसेवेसाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारत असल्यामुळे या पद्धतीने लोकांवर रुग्णाला व्हीलचेअरवरून ढकलत आणण्याची वेळ आली आहे ही बाब अतिशय दुर्देवी आहे आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे अनगोळकर म्हणाले.

सरकारने रुग्णसेवेसाठी ॲम्ब्युलन्स सोय केलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक सेवाभावी संस्थांच्या ॲम्बुलन्स कार्यरत आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक हॉस्पिटलसाठी आता नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. सरकारी ॲम्बुलन्स योजना जनतेपर्यंत न पोहोचता कागदावरच राहत असेल तर तिचा उपयोग काय? असा असा जनतेचा सवाल आहे.

माझी सर्व खाजगी ॲम्बुलन्स चालकांना विनंती आहे की रुग्ण आणि त्यांच्या नातलगांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नका. कोणताही रुग्ण हा आपला घरचा आहे असे समजून थोडी माणुसकी दाखवा. आज समाजाला तुमच्या मदतीची गरज आहे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी यावेळी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.