Wednesday, May 1, 2024

/

ॲम्ब्युलन्ससाठी दर निश्चित : ज्यादा दर आकारल्यास कारवाई

 belgaum

कोरोना प्रादुर्भाव काळात खाजगी ॲम्ब्युलन्स चालकांनी ज्यादा दर आकारण्यात यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. तसेच खाजगी ॲम्ब्युलन्ससाठी ठराविक दरपत्रक जाहीर केले असून त्यानुसारच दर आकारावा अशी सूचना करण्यात आली आहे.

कोरोना प्रादुर्भाव काळात रुग्ण संख्येत सध्या झपाट्याने वाढ होत असल्याने ॲम्ब्युलन्सना मागणी वाढली आहे ॲम्ब्युलन्सची सेवा अत्यावश्यक बनल्यामुळे या संधीचा गैरफायदा कांही खाजगी ॲम्ब्युलन्स चालकांनी घेण्यास सुरुवात केली आहे. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये किंवा कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी त्यांच्याकडून मनमानी भाडे आकारले जात असून अक्षरशः लूट केली जात आहे.

त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांच्या कुटुंबीयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. याबाबतच्या तक्रारी वाढल्यामुळे नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या विशेष बैठकीत खाजगी ॲम्ब्युलन्सचा दर निश्चित करण्यात आला आहे. या दराप्रमाणे रुग्णांकडून खाजगी ॲम्ब्युलन्स चालकांनी दर आकारावा, अशी सक्त सूचना करण्यात आली आहे.

 belgaum

कोरोनाग्रस्त रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी 10 कि. मी. अंतरा करिता 1500 रुपये दर आकारण्यात यावा. तसेच 10 कि. मी.च्या पुढील अंतरासाठी प्रति कि. मी. 120 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. वेटिंग चार्जचा दर 200 रु. ठरविण्यात आला आहे. हा दर आकारण्यापूर्वी खाजगी ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन साहित्य, पीपीई किट, हातमोजे फेसशिल्ड, सॅनिटायझेशन आदींची व्यवस्था ठेवावी लागणार आहे.

तर बीएलएस (बेसिक लाईफ सपोर्ट) ॲम्ब्युलन्सनी 10 कि. मी. अंतरासाठी 2000 रु. आणि त्यापुढील प्रति किलोमीटरसाठी 120 रु. दरात आकारावा. या ॲम्ब्युलन्ससाठी वेटिंग चार्ज दर 250 रुपये निश्चित करण्यात आला आहे. खाजगी ॲम्ब्युलन्स चालकांनी या दरानुसारच रुग्णांकडून दर आकारावा, अशी सूचना आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे सहाय्यक संचालक के. चिरंजीवी यांनी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.