Thursday, December 26, 2024

/

*शनिवार रविवारचा 48 तासांचा लॉकडाऊन असा असेल*

 belgaum

*शनिवार रविवारचा 48 तासांचा लॉकडाऊन असा असेल*-वाढत्या रुग्ण संख्येमुळे बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार दि २२ रोजी सकाळी सहा वाजल्यापासून सोमवार दि.२४ सकाळी सहा वाजेपर्यंत कडक लॉक डाऊन घोषित केला आहे.

या कालावधीत सकाळी सहा ते दहा या वेळेत केवळ दूध विक्रीला परवानगी आहे.अन्य सगळी दुकाने बंद राहणार आहेत.केवळ औषध दुकाने सुरू राहणार आहेत.

हॉस्पिटलला जाणाऱ्या व्यक्तींना बाहेर पडण्यास अनुमती आहे.मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना आंतरराज्य आणि आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी आहे.

किराणा आणि अन्य सगळी दुकाने बंद राहणार आहेत.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.