कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने संपूर्ण भारत देशात थैमान माजलेले आहे. आपल्या बेळगाव जिल्हात देखिल परिस्थिती गंभीर होत चालली आहे.अशा या महा मारीत अनेक युवक कोरोना योद्धे म्हणून रस्त्यावर उतरलेले आहेत.
काकती येथील,मराठा वारीअर्स युवक मंडळ यमुनापूर गल्ली यांनी एक अनोखा उपक्रम राबविला.येथील युवकांनी कोरोना बाबत काही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन गल्लीतील प्रत्येक घरात जाऊन सामाजिक अंतर ठेवत या महामारी विरुद्ध जनजागृती करत आहेत. जेणेकरून आपण या योग्य ती खबरदारी घेऊ.
*यामध्ये खालील मुद्दे सांगत होते*
1.कोरोना हा कशाप्रकारे आपल्या शरीरात शिरतो.
2.या काळात आपण कोणत्या पद्धतीने खबरदारी घेतली पाहिजेत.
3. महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरात रोग प्रतिकार शक्ती कशाप्रकारे वाढवावी.
4.कोरोना ची लक्षणे काय आहेत.
अशा पद्धतीने येथील युवक लोकांना जागृत करत होते. त्यांच्या मनातील शंकांचे निरसन करतं आहेत. त्यांना धीर देत आहेत.
जनजागृती मोहिमेत विनायक केसरकर,श्रीकांत पाटील, विनायक दळवाई, मारुती कोचेरी, विनोद कोचेरी, विनोद पाटील,विशाल नागवडेकर, कल्लाप्पा कोचेरी आणि आशिष कोचेरी हे युवक उपस्थित होते.
कोरोना ला जास्त घाबरूही नका आणि त्याच्याकडे दुर्लक्ष देखील करू नका. आपल्याला फक्त योग्य ती खबरदारी घ्यायची आहे.हाच सल्ला या युवकांनी दिला.