राज्यात संपूर्ण जिल्ह्यात क्लोज डाऊन जारी करण्यात आला आहे. यामुळे परप्रांतीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी एक बैठक घेऊन परप्रांतीयांच्या चाचणीबाबत गांभीर्य घेतले आहे. प्रत्येक परप्रांतीयांची कोविड चाचणी ग्रामपंचायतीने करून त्यांना उद्योग खात्रीतून काम देण्याचे आवाहन नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे परप्रांतीयांची कोविड चाचणी सक्तीचे असणार आहे.
बेळगाव जिल्ह्यात अनेक गावांमध्ये कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सध्या भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाही नागरिकांना मात्र याचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. दरम्यान बेळगाव शहर तसेच ग्रामीण भागात दरनिर्वाहासाठी अनेक परप्रांतीय दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर असून दरम्यान ज्या ग्रामपंचायत हद्दीत परप्रांतीय असतील त्यांची कोविड चाचणी करून त्यांना कामे देण्याची सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी केले आहे.
जिल्हा पंचायतीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत तालुका पंचायत मधील अधिकारी व तालुक्यातील ग्राम विकास अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी वरील सूचना केल्या आहेत. अनेक परप्रांतीयांना कामे नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.
त्यामुळे त्यांचे जगणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत त्यांना उद्योग खात्रीतून कामे देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावावा. परप्रांतीयांना लस देऊन त्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींचे आहे. त्यामुळे यापुढे परप्रांतीयांची काळजी घेऊन त्यांना योग्य कोरोनाचे नियम सांगा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले आहेत.