भाजपने बेळगावातील मराठी मतांची ताकत ओळखली असून याची अप्रत्यक्षपणे कबुलीच याच पक्षाच्या सरकारमध्ये असलेल्या गृहमंत्र्यांनी दिली आहे. समितीच्या शुभम शेळके यांना कमी लेखण्याची चूक महागात पडली कारण 40 हजार मते समितीला मिळतील असे आम्ही समजत होतो मात्र एक लाखाहून मते त्यांनी मिळवली असं गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं आहे.
एकजुटीने संघटनात्मक काम करण्याची गरज भाजपला निर्माण झाली आहे.हाच संदेश या निवडणुकीत घ्यायचा आहे असेही ते म्हणाले.
भाजप उमेदवाराला म्हणावा तसा लीड मिळाला नाही.काँग्रेस पक्षा पेक्षा सतीश जारकीहोळी यांचे वर्चस्व या मतदारसंघात कामी आलेलं हे हे या निकाला वरून स्पष्ट झालंय.
मागील 2018 लोकसभा निवडणुकीत 7 लाख मते भाजपला मिळाली होती. त्या तुलनेत यावेळी 4 लाख 40 हजार मते मिळाली आहेत जवळपास मागील पेक्षा अडीच लाख मते कमी झाली आहेत.
मागच्याच निवडणुकीत शुभम शेळके सारख्या 26 वर्षीय युवकाला 460 मते मिळाली होती ती वाढत या निवडणुकित लाखांवर मते झालीत यातील वाढ देखील भाजपची डोखेदुःखी वाढवणारी आहे.