कोव्हॅक्सीन लस पुढील आठवड्यात उपलब्ध होईल- जिल्हाधिकारी-
जायंट्स मेनच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासनजायंट्स मेन या सेवाभावी संघटनेच्या वतीने कोव्हॅक्सीन लसीच्या टंचाई बाबत जिल्हाधिकारी हरीशकुमार यांची भेट घेण्यात आली.
गेल्या सात आठवड्यापूर्वी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना हात हलवत परतावे लागत असल्याने जायंट्स मेनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी हरीशकुमार यांची भेट घेतली.
त्यावेळी हरीशकुमार म्हणाले की जेवढे जास्त दिवस होतील तितकी त्याची प्रतिकारशक्ती वाढेल त्यामुळे घाबरून जायचे कारण नसून सोमवार नंतर कोव्हॅक्सीनचा सुरळीत पुरवठा होईल आणि दुसरा डोस घेणाऱ्याना प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी अध्यक्ष संजय पाटील, विशेष समिती सदस्य मदन बामणे, राजू बांदिवडेकर, राजू जैन आणि आनंद कुलकर्णी उपस्थित होते.