Friday, April 26, 2024

/

…अन् उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बीम्सच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

 belgaum

बीम्स हॉस्पिटल बाबतच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आज शनिवारी अचानक बीम्सला भेट देऊन तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. ‘या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना काय सांगायचे’, असे हताश उद्गारही त्यांनी काढले.

बीम्स -सिव्हील हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांसह अन्य रुग्णांवर देखील उपचार केले जात आहेत. मात्र रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आज शनिवारी अचानक बीम्सला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.

भाजप नेते किरण जाधव यांनी जिल्हा रुग्णालयाचे वाभाडे काढले होते व बिम्सच्या कारभाराची माहिती उपमुख्यमंत्री सवदी यांना दिली होती त्या नंतर अनेकांनी याबाबत तक्रार आल्या होत्या त्याची दखल उपमुख्यमंत्री सवदी यांनी घेत बिम्सला भेट दिली आहे.

 belgaum

पीपीई किट घालून कोरोना वार्डात प्रवेश करून त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचाराबाबत माहिती घेऊन त्यांनी तेथील गैरव्यवस्थेबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरले.Bims savadi

बीम्सला दिलेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले, लोकांकडून तसेच वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावरील तक्रारी पाहून मी आज जाणीवपूर्वक अचानक बीम्सला भेट दिली. पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्तांना धीर दिला. येथील गैर व्यवस्थेबद्दल काय बोलावे कळत नाही.

बीम्सचे प्रशासन गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. यापूर्वी एकदा त्यांना इशारा दिला आहे. आता मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स झाल्यानंतर बीम्सच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मग त्यांना काय ते सांगतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सवदी यांनी आपला संताप व्यक्त केला.याप्रसंगी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत मुन्याळ, संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.