मुतनाळ जवळ ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या एका वाहनाचा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात ऑक्सिजन लिकेज झाले नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. याबाबत हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
संपूर्ण राज्यात ऑक्सिजनची कमतरता असल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय महामार्गावर ऑक्सिजन वाहनाला झालेला अपघात म्हणजे मोठी दुर्घटना आहे. मात्र सुदैवाने यामध्ये ऑक्सीजन लिकेज न झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत असली तरी नेमका अपघात कशामुळे व कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
अपघात झालेला टँकर ऑक्सिजन घेऊन बेळगावकडे येत होता. या दरम्यान टायर फुटल्याने समोर असलेल्या ट्रकला त्याने ठोकर दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर वाहन चालकाने नियंत्रण ठेवून मोठी दुर्घटना घडण्याची टाळले आहे.
त्यामुळे ऑक्सिजन लिकेज नव्हता हा टँकर तसाच धडक देऊन थांबला. त्यामुळे ऑक्सिजन वाहून येणारे सिलिंडर शाबीत राहिले आहे. सुदैवाने यामध्ये ऑक्सीजन द्रव्याचे नुकसान झाले नाही. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडल्याने हिरे बागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याबाबत हिरे बागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.