Wednesday, November 27, 2024

/

एसएसएलसी, पीयुसी परीक्षेबाबत अद्याप निर्णय नाही

 belgaum

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने देशभरातील दहावीची परीक्षा रद्द केली असली तरी कर्नाटक सरकारने मात्र त्या धर्तीवर अद्याप एसएसएलसी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एस सुरेशकुमार यांनी दिली.

राज्यसरकारने एसएसएलसी व पीयूसी परीक्षांचे आयोजन केल्यास कोरोनाग्रस्त विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रांमध्ये पेपर लिहिण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. दरम्यान, सरकार कोरोना परिस्थितीवर नजर ठेवून आहे. एकंदर सर्व बाबींचा विचार करून भविष्यात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.