Saturday, April 27, 2024

/

दहावी, बारावी परीक्षा वेळापत्रकानुसारच : सुरेशकुमार

 belgaum

कर्नाटक राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने खबरदारी म्हणून पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत; मात्र कर्नाटक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी दहावी व बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे घेतल्या जातील, असे शालेय शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

काही जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्यात आली आहे. त्यामुळे, राज्यात लॉकडाऊन किंव्हा नाईट कर्फ्यू होणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. तसे झाल्यास दहावी व बारावीच्या परीक्षांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, शिक्षणमंत्र्यांनी हा संभ्रम दूर केला असून ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार असून विद्यार्थी व पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

गेल्यावर्षी कोरोनामुळे बारावीचा शेवटचा पेपर लांबणीवर टाकण्यात आला होता. तर दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. यावेळी जानेवारीपासून दहावीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे, विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचे संकट वाढू लागल्याने विद्यार्थ्यांची चिंताही वाढली आहे. मात्र, शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

 belgaum

सीबीएसई दहावी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. शिक्षण खात्याने मे महिन्यात बारावी तर जूनमध्ये दहावीची परीक्षा घेण्यात येईल असे सांगत काही दिवसांपूर्वी दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते.

यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचा विचार सध्या तरी नाही, आता कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे,असे स्पष्टीकरण सुरेशकुमार यांनी दिले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.