कोरोनाच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर सध्या बेळगावात बीम्स -सिव्हिल हॉस्पिटल, डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि लेक व्ह्यू हॉस्पिटल या तीन ठिकाणी कोणीही आपली कोरोना चांचणी करून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे कोरोनासंदर्भात गरजूंसाठी सहाय्य सुविधादेखील उपलब्ध आहेत.
बेळगावातील कोरोना तपासणी केंद्रांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. बीम्स -सिव्हिल हॉस्पिटल येथे स्वॅब नमुने घेणे आणि तपासणी करणे, केएलई डाॅ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथे स्वॅब नमुने घेणे आणि तपासणी करणे (वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत). गोवावेस येथील लेक व्ह्यू हॉस्पिटल येथे स्वॅब नमुने घेणे आणि मराठा मंडळ (एमएमडीसी) येथे त्यांची तपासणी. घरी येऊन स्वॅबचे नमुने घेण्याची सेवाही उपलब्ध : 0831-2403333. आईसीएमआर -एनआयटीएम येथे स्वॅब तपासणी. जेएनएमसी येथे स्वॅब तपासणी. केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथे रॅपिड अँटीजन टेस्टची सेवा देखील उपलब्ध आहे. कोरोनाग्रस्तांसाठी ऑक्सिजन आणि बेडसाठी कोविड हेल्पलाइनची सुविधा सुरू करण्यात आली आहे ती खालील प्रमाणे आहे.
कोविड सपोर्ट ग्रुप : हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सीजन सिलेंडर्स, ऍम्ब्युलन्स, एचआरसिटी चेस्ट स्कॅन, रक्ताचा अहवाल वगैरे कोरोनाशी संबंधित कांही समस्या असतील तर गरजूंनी 18001022716 या 24 तास कार्यरत असणाऱ्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.
फेसबुक फ्रेंड्स सर्कल : ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेर्स, ऑक्सीजन सिलेंडर्स, पल्स ऑक्सीमिटर, व्हील चेअर. संपर्क -9986809825.
हेल्प फॉर नीडी / सुरेंद्र अनगोळकर : ऑक्सीजन सिलेंडर्स, ऍम्ब्युलन्स, हॉस्पिटलमध्ये मदत, हर्सेव्हॅन (शववाहिका), शुश्रृषा सहाय्यक. संपर्क -8618993767.
अथर्व मेडिकल फाउंडेशन : कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी माफक दरात ऑक्सीजन सिलेंडर्स पुरवठा. संपर्क -9164563353, 9480687580, 9341108635.
कोविंड सहाय्यवाणी (हेल्पलाइन) : जिल्हा सहाय्यवाणी क्र. 0831 -2407290 (1077), 0831 -2424284.
आप्तमित्र हेल्पलाइन : 14410.
डीएसओ डाॅ. बी. एन. तुकार -9449843245.
डीएचओ डॉ. एस. व्ही. मुन्याळ -9449843039.
विम्यासंबंधी चौकशी : मोफत सल्ला -सूचना अमित कालकुंद्री -9008984726.