कर्नाटकातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे अखेर इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक आणि मश्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांना आतापर्यंत शाळेत झालेल्या परीक्षा आणि सरासरी मूल्यांकनानुसार उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थीवर्ग खुश झाला आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.
कर्नाटकात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली चाचणी, सहामाही, घटक चाचणी झाली. त्यातून विद्यार्थ्यांचे आम्ही वर्षभर मूल्यमापन केले आहे.
परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी पालकांनी पाल्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये, अशी सूचना शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि शिक्षण खात्यातील अधिकारी आणि तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी बंगळूरमध्ये ही माहिती दिली.