शिनोळी येथील कर्नाटक -महाराष्ट्र सीमा झाली सील-कोरोना महामारी थोपविण्यासाठी आता बेळगाव -चंदगड दरम्यानची शिनोळी येथील कर्नाटक -महाराष्ट्र सीमा सील डाऊन करण्यात आली आहे.
धोरणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिनोळी येथील कर्नाटक -महाराष्ट्र सीमा बॅरिकेड्स घालून बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी आता अत्यावश्यक सेवा वगळता अन्य रहदारीवर बंदी घालण्यात आली आहे.
फक्त वैद्यकीय सेवेसह भाजीपाला, दूध आदींच्या वाहतुकीला या ठिकाणी मुभा असून इतरांसाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून आवश्यक कसून तपासणी अंती वाहनांना महाराष्ट्रातून कर्नाटकात बेळगावच्या दिशेने प्रवेश दिला जात आहे.
बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढण्याबरोबरच महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्ण संख्येने उच्चांक गाठल्यामुळे बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.
Nice