बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाच्या अधिकृत उमेदवार मंगला अंगडी यांनी आपल्या संपत्तीबाबतची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली. मंगला सुरेश अंगडींनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, कुटुंबातील सदस्यांची एकूण मालमत्ता ३०.७१ कोटी रुपये आहे. यापैकी वारसा ५.३६ कोटी रुपये आणि मालमत्ता २५.३५ कोटी रुपयांची आहे.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्जासोबत मालमत्ता, आर्थिक उत्पन्न आणि संपत्ती यांचे विवरण देणारे प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाला सादर केले आहे.
विविध सोसायटी, संस्था व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ३७.६२ लाख आणि विविध कंपन्यांमध्ये १६.४८ लाख रुपये विमा आणि पाॅलीसी आहेत. भाजपाच्या उमेदवार मंगला अंगडींनी विविध बँकांकडून ७.५५ कोटी रुपये कर्ज घेतले आहे आणि बेळगाव आणि बेंगळुरूमधील घरे आणि मालमत्ता यासह विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये गुंतवणूक केली आहे.
मंगला अंगडींची एकूण मालमत्ता १४.७७ कोटी असून त्यामध्ये ३.७४ कोटी वारसा मालमत्ता आणि ११.३ कोटी रुपये स्थावर मालमत्ता आहे. ६०.२३ लाख रुपये देणं आहे. पती सुरेश अंगडी यांच्या नावावर एकूण १५.९४ कोटी रुपयांची संपत्ती आहे, ज्यात वारसा मालमत्ता १.६२ कोटी आणि स्थावर मालमत्ता १४.३२ कोटी रुपये आहे.