Friday, December 20, 2024

/

ओळखपत्र एकाचे यादीत नांव भलत्याचे : रुक्मिणीनगर येथील प्रकार

 belgaum

बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी गेलेल्या एका मतदाराच्या मतदार क्रमांकावर भलत्याचेच नांव चढवण्यात आल्याच धक्कादायक प्रकार रुक्मिणीनगर येथील एका मतदार केंद्रांमध्ये उघडकीस आल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे.

प्रत्येक निवडणुकीप्रमाणे यावेळी बेळगावच्या लोकसभा पोटनिवडणूकीमध्ये देखील मतदारांच्या यादीमधील सावळागोंधळ करण्यात आल्याचे उघडकीस येऊ लागले आहे. शहरातील बेळगाव उत्तर मतदार संघातील रुक्मिणीनगर येथील सरकारी ऊर्दू उच्च प्राथमिक शाळेमध्ये असणाऱ्या 74 ए क्रमांकाच्या मतदान केंद्रांमध्ये एका मतदाराच्या मतदार क्रमांकावर भलत्याचेच नांव चढवण्यात आल्याचे आढळून आले आहे. किरण कल्लाप्पा गिरी या मतदाराच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. किरण यांना भारतीय निवडणूक आयोगाकडून आरटीडी 4249777 या क्रमांकाचे अधिकृत मतदार ओळख पत्र देण्यात आले आहे.

सदर ओळखपत्र घेऊन किरण गिरी आज सकाळी रुक्मिणीनगर येथील उपरोक्त मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठी गेले असता. त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये त्यांच्या मतदार क्रमांकावर तोसिफ नजीरअहमद बाडीवाले, वय 36 हे नांव नमूद असल्याचे आढळून आले.

हा प्रकार पाहून किरण यांना धक्काच बसला असून मतदान केंद्र परिसरात हा एक चर्चेचा विषय झाला आहे. तसेच घटनेने दिलेला मतदानाचा हक्क किरण गिरी यांना मिळायला हवा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निवडणुकीमध्ये प्रत्येक मत बहुमूल्य ठरत असल्यामुळे नेतेमंडळीही याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.