बेळगाव महापालिकेच्या ५८ प्रभागांचे अंतिम आरक्षण नगरविकास खात्याने जाहीर केले आहे. १० ऑगस्ट २०१८ रोजी निश्चित केलेली प्रभाग पुनर्रचना गृहीत धरूनच हे प्रभाग आरक्षण जाहीर केले आहे.
१६ जानेवारी रोजी नगरविकास खात्याने तात्कालिक प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले होते. त्यावर आक्षेपही मागविले होते, पण अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर करताना तात्कालिक प्रभाग आरक्षणात कोणताही बदल केलेला नाही. १६ जानेवारीला जाहीर केले होते तेच प्रभाग आरक्षण १९ एप्रिल रोजी कायम ठेवण्यात आले आहे.
१६ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या तात्कालिक प्रभाग आरक्षणाच्या विरोधात बेळगावच्या दहा जणांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही. २२ एप्रिल रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. त्याआधीच नगरविकास खात्याने अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर केले आहे.
आरक्षणात बदल व्हावा, यासाठी अनेकांनी बंगळूरपर्यंत धडपड केली होती. परंतु अंतिम आरक्षण जाहीर करण्यात आल्याने इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. गेला महिनाभर बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत व्यस्त असलेल्या महापालिका प्रशासनाला आता महापालिका निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे.
अर्थात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा व तालुका पंचायत निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे बेळगाव महापालिका निवडणूकही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. परंतु अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्रमांक आरक्षण
१ इतर मागास अ महिला
२ सामान्य
३ इतर मागास ब महिला
४ सामान्य
५ सामान्य महिला
६ इतर मागास अ
७ इतर मागास ब
८ सामान्य
९ इतर मागास अ महिला
१० इतर मागास ब महिला
११ सामान्य
१२ इतर मागास अ
१३ सामान्य महिला
१४ इतर मागास ब
१५ इतर मागास अ महिला
१६ सामान्य
१७ अनुसूचीत जाती महिला
१८ सामान्य
१९ इतर मागास अ
२० सामान्य महिला
२१ इतर मागास अ महिला
२२ सामान्य
२३ सामान्य
२४ इतर मागास अ
२५ सामान्य महिला
२६ इतर मागास अ महिला
२७ सामान्य
२८ अनुसूचित जाती
२९ सामान्य
३० इतर मागास अ
३१ इतर मागास अ महिला
३२ अनूसूचित जाती
३३ सामान्य महिला
३४ सामान्य
३५ अनुसूचित जाती महिला
३६ सामान्य
३७ सामान्य महिला
३८ इतर मागास अ
३९ सामान्य
४० इतर मागास अ महिला
४१ सामान्य
४२ इतर मागास अ
४३ सामान्य महिला
४४ सामान्य
४५ अनुसूचित जमाती महिला
४६ सामान्य
४७ सामान्य महिला
४८ इतर मागास अ
४९ सामान्य महिला
५० सामान्य महिला
५१ अनुसूचित जाती
५२ सामान्य महिला
५३ अनुसूचित जमाती
५४ सामान्य महिला
५५ सामान्य महिला
५६ सामान्य महिला
५७ सामान्य महिला
५८ सामान्य महिला