बेळगाव जिल्ह्यात आज कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. आज नव्याने २२० रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटीननुसार देण्यात आलेल्या माहितीमध्ये आज नव्याने नोंद झालेल्या २२० रुग्णांसहित जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २९८९६ इतकी झाली आहे.
तसेच दोन रुग्णांच्या मृत्यूनंतर एकूण मृतांचा आकडा ३५८ वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे ६० रुग्णांना कोविड उपचाराअंती प्रकृती सुधारल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत २७८४१ रुग्णांनी कोरोनावर यशसवीपणे मात केली आहे. तर अद्यापही १६९७ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाने जाहीर केलेल्या मार्गसूचीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.