Wednesday, May 1, 2024

/

आढळलेल्या नव्या 92 बाधितांपैकी 73 बेळगाव तालुक्यातील

 belgaum

बेळगाव जिल्ह्यात नव्याने 92 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून आज गुरुवारी आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 345 झाली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी 73 रुग्ण एकट्या बेळगाव तालुक्यातील आहेत.

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 92 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे आज गुरुवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 27,834 इतकी झाली आहे. बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज गुरुवार दि. 8 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 6,06,233 व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 35,384 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 476 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 34,358 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 5,36,015 आहे.

कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 6,05,141 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 27,834 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज गुरुवारी नव्याने आढळलेल्या 92 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 5,71,430 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 476 आहेत. त्याचप्रमाणे 2,606 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

 belgaum

जिल्ह्यात आतापर्यंत 345 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 27,013 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज गुरुवारी आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्यातील 73, चिकोडी 5, सौंदत्ती 4, खानापूर 3, अथणी 2, गोकाक व रामदुर्ग प्रत्येकी 1 आणि इतर 3 अशा एकुण 92 रुग्णांचा समावेश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.