सरकारला सर्वाधिक महसूल देणाऱ्या बेळगाव उपनोंदणी अर्थात सब रजिस्ट्रार कार्यालयातील एका अधिकाऱ्याला सरकारला नुकसानीत आणल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे.
निलंबित करण्यात आलेल्या अधिकार्याचे नांव विष्णुतीर्थ असे आहे. मालमत्तेची नोंदणी करताना सरकारी दरापेक्षा त्याची किंमत कमी करून लावण्यात आल्यामुळे सरकारला 12 कोटी 99 लाख रुपयांचा तोटा झाल्याचा ठपका ठेवून अधिकारी विष्णुतीर्थ यांना निलंबित करण्यात आले आहे. सन 2015 ते 2018 या कालावधीत एकूण 9 मालमत्तांची नोंदणी झाली आहे. या नोंदणी प्रकारे मालमत्तेची जी सरकारी किंमत आहे त्या किंमतीनुसार सरकारला 12 कोटी 99 लाख रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित होते. परंतु मालमत्तेची किंमत सरकारी दरापेक्षा कमी लावून त्याची नोंदणी केल्याचा ठपका विष्णुतीर्थ यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून त्यांना उपनोंदणी खात्याचे राज्य आयुक्त पुंन राजू यांनी निलंबनाचा आदेश बजावल्याचे सांगण्यात येते.