Monday, November 25, 2024

/

*वांग*- वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टीप्स

 belgaum

काळे डाग म्हटले की कुणालाही ते नकोसेच असतात. अगदी स्त्री असो वा पुरुष, काळ्या डागांवर उपचाराबाबत सजग असतात. पण हे काळे डाग येतात कशामुळे? आणि ते न होण्यासाठी काय केलं पाहिजे? असे प्रश्न अनेकांना पडतात. आपल्या त्वचेमध्ये मेलॅनीन नावाचा एक घटक असतो. तो आपल्या त्वचेला रंग देतो.

काळे डाग म्हटले की कुणालाही ते नकोसेच असतात. अगदी स्त्री असो वा पुरुष, काळ्या डागांवर उपचाराबाबत सजग असतात. पण हे काळे डाग येतात कशामुळे? आणि ते न होण्यासाठी काय केलं पाहिजे? असे प्रश्न अनेकांना पडतात. आपल्या त्वचेमध्ये मेलॅनीन नावाचा एक घटक असतो. तो आपल्या त्वचेला रंग देतो. जास्त मेलॅनीन असेल तर त्वचेचा रंग सावळा किंवा काळा असतो व मेलॅनीन कमी असेल तर गोरा असतो. जेव्हा आपण काळे डाग आहेत, असं म्हणतो याचा अर्थ त्या ठिकाणी मेलॅनीनचं प्रमाण जास्त झालं असतं.
सूर्यकिरणं : हे काळे डाग उद्भविण्याचं प्रमुख कारण आहे. सूर्यकिरणं हे त्वचेतील मेलॅनीनचं प्रमाण वाढवतात. मेलॅनीन हे मूळत: नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करतं. हे धोकादायक सूर्यकिरणांपासून त्वचेचं रक्षण करतं. परंतु जेव्हा आपली त्वचा वारंवार सूर्यकिरणांच्या संपर्कात येते तेव्हा हे मेलॅनीन कमी-अधिक प्रमाणात वाढतं व काळे डाग दिसायला लागतात.

वाढतं वय : वाढत्या वयात त्वचेसंबंधी बऱ्याच समस्या निर्माण होतात. वयाच्या चाळीशीनंतर त्वचेची पुनर्निर्मितीची क्षमता मंदावते. त्यामुळे काळे डाग दिसायला लागतात.
हार्मोनल बदल: हार्मोनल बदलांमुळे येणाऱ्या काळ्या डागांना मेलॉजमा किंवा कोलॅजमा म्हणतात. हे हार्मोन्स जेव्हा आपली त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते तेव्हा मेलॅनीनचं प्रमाण वाढवतं. मेलॅजमा हे गरोदर स्त्रियांमध्ये बघायला मिळतं.Pigmentation

जखम झाल्यानंतर होणारे काळे डाग: यामध्ये जळल्यामुळे, सोरायसीसमुळे, पुरळामुळे होणाऱ्या जखमांवर काळे डाग येतात.
परफ्युम : परफ्युममध्ये फोटोसेन्सीटायझर असतं. ते सूर्यकिरणांना त्वचेकडे आकर्षित करतं. परफ्युम लावल्यानंतर लगेच उन्हात आलात तर काळे डाग पडतात. हे टाळण्यासाठी परफ्युम कपड्यांवर लावला जातो. त्वचेवर नाही.

प्रदूषण : आजकाल प्रदूषणामुळेही त्वचेचे बरेच रोग उद्भवत आहेत.
औषधांचे परिणाम : होमियोपॅथी आणि अँटीबायोटिक्समुळेदेखील काळे डाग येतात. काही व्हिटॅमिनच्या अभावामुळेदेखील काळे डाग पडतात.

अनुवांशिक : अनुवांशिकतेनुसार मेलाजमा होऊ शकतो.

काळ्या डागांवर उपचार

सनस्क्रीन : सनस्क्रीन हा चेहऱ्याची त्वचा काळवंडू न देता उजळ व तजेलदार ठेवतो. सनस्क्रीन चेहऱ्यावर रोज लावायला पाहिजे. अगदी ढगाळ वातावरण असेल तरीही. कारण अशा वातावरणातही सूर्याची अपायकारक किरणं त्वचा काळवंडवतात. काळे डाग पडतात. आम्ही घरीच राहात असूनसुद्धा आमची त्वचा काळवंडते किंवा काळे डाग येतात, अशा तक्रारी अनेक महिला करतात. त्याचं कारण असं की गृहिणी असल्या तरी काही कामासाठी उन्हात ये-जा होतेच. त्यामुळे त्वचेवर किरणं पडून त्वचा काळवंडायला सुरुवात होते. सनस्क्रीनचा परिणाम दोन-तीन तास असतो.
त्यामुळे ते उन्हाळ्याच्या दिवसात वारंवार लावावं लागतं. खूप लोकाचं म्हणणं असतं की आमची त्वचा तेलकट आहे. त्यामुळे आम्ही सनस्क्रीन लावू शकत नाही. तर ते तसं नसतं. तेलकट त्वचेसाठी वेगळं सनस्क्रीन बाजारात उपलब्ध असतं.
व्हिटॅमिन सी : व्हिटॅमिन सी चेहऱ्यावर लावल्याने काळे डाग कमी होतात. ते मेलॅनीनचं प्रमाणही कमी करतं. त्यामुळे रंगही उजळतो.

लेझर : लेझरमुळे काळे डाग घालवता येतात.
केमिकल पीलिंग : यामध्ये चेहऱ्यावर एक सोल्युशन लावलं जातं. यामुळे चेहऱ्याच्या वरच्या भागातील स्तर निघतो आणि काळे डाग कमी होतात. त्वचा स्मूथ होते. तजेलदार दिसायला लागते.

मायक्रोडर्माब्रेशन : यामध्ये चेहऱ्याच्या वरच्या भागातील त्वचा निघून नवीन त्वचा येते. त्यामुळे काळे डाग नाहीसे होतात.

मायक्रो निडलिंग : यामध्ये जे औषध डाग कमी करण्यासाठी किंवा रंग उजळण्यासाठी वापरतात, ते मायक्रो निडलिंगने चेहऱ्याच्या आत सोडले जातात.
होमिओपॅथी
आमच्या उपचारांनी पर्मनंट फायदा होतो.
Call us 9916106896
9964946918

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.