Friday, April 26, 2024

/

‘बाग पारिवाराचे काव्यवाचन’

 belgaum

मराठी साहित्य क्षेत्रात बेळगावचा खूप मोठा वाटा आहे.अनेक मोठे दिग्गज साहित्यिक या भुमिने दिले आहेत.याच पावलावर पाऊल टाकत फूल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्ही मराठी भाषेसाठी, मराठी भाषा संवर्धनासाठी, मराठी भाषा वाढीसाठी जे कार्य करत आहात ते खरोखरच वाखानन्याजोगे आहे.असे मत जेष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांनी व्यक्त केले.

येथील बाग परिवार यांच्या वतीने आयोजित काव्यवाचन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.सदर कार्यक्रम नुकताच रामदेव गल्ली येथील शहिद भगतसिंग सभागृहात मोठ्या उत्साहाने पार पडला.यावेळी व्यासपिठावर कवी संदीप एम मुतगेकर उपस्थित होते.

बोलताना पाटील पुढे म्हणाले केवळ कविता पुरता मर्यादित न राहता प्रत्येकांनी मराठी साहित्यात असणारे चारोळ्या, गझल, ललित लेखन, कथा,हायकु, आदी सर्व प्रकारांचा विविध अंगाने अभ्यास करून समजून घेणे गरजेचे आहे.जेणेकरून हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत आपणांस पोहचविण्यास सोप्पे जाईल.तसेच आपणच आपल्या मराठी भाषेचे खर्याअर्थाने वारकरी आहोत.असे सांगून पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

 belgaum

प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.त्यांनंतर कवयित्री स्मिता पाटील यांनी ”आम्ही जगायच कसं? ही शेतकऱ्यांची व्यथा सांगणारी कविता सादर करुन कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली.कवी भरत गावडे यांनी “झाड आणि पुस्तक” ही एक वेगळ्या धाटणीची कविता सादर करून काव्यरसिकांना विचार करण्यास भाग पाडले.कवी परशराम कामती व कवयित्री धनश्री मुंचडी यांनी आई वरचे निस्सिम प्रेम आपल्या आई व अचानक या कवितांमधून व्यक्त केले.Baag pariwar

कवी अशोक सुतार यांनी संशय तर कवियित्री डॉ मेघा भंडारी यांनी प्रेम ही कविता सादर करुन उपस्थित काव्यरसिकांमध्ये एकच हशा पिकवला.कवी विश्वनाथ मुरगोडी यांनी “तो पुन्हा येतोय” ही कविता सादर करुन कोरानाचा उद्रेक मांडला.कवयित्री अपर्ना पाटील यांनी “असंही प्रेम असतं” ही एक प्रेमाची वेगळी छटा मांडणारी कविता सादर केली.प्रत्येकवेळी आपले वेगळेपण जपणार्या कवयित्री रोशनी हूंद्रे यांनी यावेळी “देवदासी” या वेगळ्या विषयात हात घालून काव्य संमेलन एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

कवयित्री निकीता भडकूंबे यांनी “धरणी” ही कविता सादर करुन आपलं धरणीवरच प्रेम व्यक्त केले आहे.कवी आनंद मेणशी यांनी “सगळ्यात सुंदर काय” ही कविता सादर करुन रसिकांची वाहवा मिळविली.कवयित्री मनिषा मोरे यांनी “मुलगी” ही कविता सादर करुन मुलगा व मुलगी यात भेदभाव न करण्याविषयी विनंती केली.तर मराठी भाषेचे धगधगते शिलेदार अश्वजीत चौधरी यांनी “आम्ही समितीचे वारकरी” ही कविता सादर करुन मराठी भाषेवर होणारा अन्याय, आगदी काळजातून मांडला.कवयित्री आरती पाटील व शितल पाटील यांनी “धुळवड” व “होळी” या अनुक्रमे कविता सादर करुन होळीच्या शुभेच्छा दिल्या.कवयित्री अक्षता यळ्ळूरकर यांनी आपल्या कवितेतून नांत्याचा बाजार मांडला.तर कवयित्री माधूरी माळी यांनी कृष्ण प्रेम दर्शवणारी रचना सादर करुन टाळ्यांचा गडगडाट मिळविला.तसेच प्रा मनिषा नाडगौडा यांनी होळीवरची हींदी कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले.

कवी संदीप मुतगेकर यांनी
“माळला होता गजरा कधिचाच
तिने त्याच्या नावाचा
आपली तर फुलेच विस्कटली
होती विचार करून वेदनेचा”
ही वेदना मांडणारी कविता सादर करताच सभागृहात निरव शांतता पसरली.यावेळी विनायक मोरे, निलेश खराडे,अर्जुन सांगावकर, अमोल पवार,मुक्ता पाटील,आरती कामती आदींसह काव्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रम सामाजिक अंतर पाळून कोरोनाचे नियम पाळत यशस्वी रित्या संपन्न झाला.

-संदीप मुतगेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.