कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने हा संसर्ग रोखण्यासाठी आणि सांसर्गिक साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने मार्गसूची जाहीर केली आहे. या मार्गसूचीचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी बेळगाव शहरात “विशेष अधिकारी” नेमण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश पालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी जारी केला आहे.
कोविड विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने जारी करण्यात आलेल्या मार्गसूचीची योग्य कार्यवाही करण्यासाठी महानगर पालिकेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी (मो.: ९४४८४१८७२४) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्त करण्यात आलेल्या विशेष अधिकाऱ्यांना मार्गसूचीसंदर्भात योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक खबरदारीच्या उपायांचे काटेकोरपणे पालन करण्याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बेळगाव एपीएमसी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीतील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक एस. व्ही. कांबळे (मो. : ९८८६४३१३३१), माळमारुती पोलीस स्थानकाच्या व्याप्तीतील अभियंत्या महादेवम्मा एन. (मो.: ७७९५३८०९९३) यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मार्केट पोलीस स्थानक व्याप्तीतील अभियंते आदिलखान पठाण (मो. : ९९६४२०७८६८) आणि खडेबाजार पोलीस स्थानक व्याप्तीतील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक संतोष कुरबेट (मो.: ९५३५३६२१३२) यांचीही विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहापूर पोलीस स्थानक व्याप्तीतील कनिष्ठ आरोग्य निरीक्षक शिवानंद भोसले (मो. : ८८९२८६५१३३), उद्यमबाग पोलीस स्थानक व्याप्तीतील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अनिल बोरगावी (मो. ७९९६७४२१३२) आणि टिळकवाडी पोलीस स्थानक व्याप्तीत कनिष्ठ आरोग्य निरीक्षक यु. ए. गणाचारी (मो.: ७९९६७४२१३२) यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
“विशेष अधिकारी” म्हणून नियुक्त करण्यात आलेले पोलीस अधिकारी दररोज संबंधित विभागात कार्यरत राहणार आहेत. शासनाच्या मार्गसूचीचे आणि निर्देशांचे उल्लंघन करण्यात आल्यास, आवश्यक असल्यास पोलिसांसह आरोग्य निरीक्षकांच्या सहकार्याने संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार या विशेष अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, आधी असे पालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.