गुरुवार दिनांक ४ मार्च रोजी हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या कारणास्तव तालुक्याच्या पश्चिम भागातील विविध गावांमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती हेस्कॉमने प्रसिद्धीस दिली आहे.
बेळगाव तालुक्यातील उचगावसह बिजगी, बोकमूर, कावळेवाडी, बेळवट्टी, बाकनूर, येळेबैल, बेळगुंदी औद्योगिक प्रदेश, सोनोली,
राकसकोप, कुद्रेमनी, कल्लेहोळ, उचगाव, बसुर्ते, बेकिनकेरे, सुळगा, तुरमुरी, कोनेवाडी व बाची या गावामध्ये गुरुवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.