मराठी भाषिक माजी नगरसेवकांचा समिती उमेदवाराला पाठिंबा,,-17 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मराठी भाषिक माजी नगरसेवकांनी पोट निवडणुकीत मध्यवर्ती समिती जो उमेदवार देईल त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नुकताच मराठी भाषिक नगरसेवकांची बैठक झाली त्या बैठकीत सदर निर्णयाचा ठराव संमत करण्यात आला.
महाराष्ट्र एकीकरण समितीने कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची पोट निवडणूक लढवावी त्यामुळं मराठी मते एक गठ्ठा राहतील राष्ट्रीय पक्षांना बहाल होणार नाहीत एकच मराठी भाषिक उमेदवार लोकसभा निकडणुकी साठी ध्यावी असाही ठराव मांडण्यात आला.
ज्या उमेदवाराला मध्यवर्ती समिती पाठिंबा देईल त्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत उमेदवाराच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असेही बैठकीत ठरवण्यात आले. सदर बैठकीत माजी महापौर सरिता पाटील माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, मोहन भांदुर्गे,राजू बिरजे,मनोहर हलगेकर ,सुधाताई भातकांडे,रूपा नेसरकर आदी उपस्थित होते ब