मराठी भाषिक बहुसंख्येने असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमा प्रदेश केंद्रशासित करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याची माहिती आज मंगळवारी लोकसभेने दिली आहे.
विविध लोकांनी वैयक्तिकरीत्या तसेच विविध संघटनांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी केली आहे. मात्र हा प्रदेश केंद्रशासित करण्यासंदर्भातील कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज दिली.
ते म्हणाले की, 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमा भागातील उपजिल्हांमधील लोकसंख्या 55 लाख 98 हजार 325 इतकी होती या जनगणनेमध्ये इचलकरंजी, कागल, कमलनगर, मैंदरगी, निपाणी, सदलगा आणि संकेश्वर या ठिकाणी मराठी भाषिक लोक बहुसंख्येने आढळून आले आहेत.