सरकारी नोकरांना पगार, भत्ता, शिक्षण सुविधा यासह 2000 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात यावी, यासह विविध मागण्या करत सरकारी नोकर वर्गाने आज आंदोलन हाती घेतले.
सरकारी नोकर आणि परिवहन मंडळाच्या कामगारांना सरकारी सुविधा, प्रती वर्षी अर्थसंकल्पात विशेष अनुदान मिळावे, अशी मागणी सरकारी नोकर वर्गाने केली आहे. यासंदर्भातील निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
सरकारी नोकर वर्गाला आणि परिवहन मंडळाच्या कामगारांना वेतन वाढवा, परिवहन संस्थेच्या कर्मचाऱ्यांना इंधन आणि टोल नाका मोफत पूर्व, प्रत्येक वर्षाच्या अर्थसंकल्पात किमान दोन हजार कोटी रुपये अनुदानाची तरतूद करा अशी मागणी परिवहन कर्मचाऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
या मागण्यांसह सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांना बसपास, शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.