गोकाक फॉल्सवर पर्यटकांसाठी पुलाचे कामकाज हाती घेण्यात आले आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुलाच्या बांधकामाचे काम येत्या जुलै महिन्यापर्यंत पूर्ण करण्याची सूचना उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली आहे.
गोकाक फॉल्सवर निर्माण करण्यात येत असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी १५.५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
हे कामकाज सुरु करण्यात आले असून येत्या जुलै महिन्यापर्यंत संपूर्णपणे काम पूर्णत्वाकडे नेण्याची सूचना उपमुख्यमंत्री गोविद कारजोळ यांनी केली.
जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह गोविंद कारजोळ यांनी कामकाज सुरु असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कामाची गुणवत्ता राखण्यासंबंधीही सूचना करण्यात आली.
जुलै महिन्याच्या अखेरीस हा पूल पर्यटकांसाठी, वाहन संचारासाठी खुला करण्यात यावा, तसेच पर्यटकांच्या सोयोसाठी पाऊले उचलण्यात यावीत, अशा सूचना अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.