Saturday, January 11, 2025

/

नव्या 15 रुग्णांमुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण झाले 27,000

 belgaum

बेळगांव जिल्ह्यात गेल्या 24 तासांत नव्याने 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून या नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 27,000 झाली आहे. त्याचप्रमाणे सध्या जिल्ह्यात 113 रुग्ण कोरोना सक्रिय आहेत.

बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज मंगळवार दि. 9 मार्च 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 5,39,659 व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 20,004 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 113 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 25,775 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 4,93,767 आहे.

कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 5,38,567 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 27,000 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज मंगळवारी नव्याने आढळलेल्या 15 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 5,07,559 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 113 आहेत. त्याचप्रमाणे 1,075 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 342 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 26,545 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज मंगळवारी आढळलेल्या 15 कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगांव तालुक्यातील 10, गोकाक 4 आणि रामदूर्ग तालुक्यातील एका रुग्णांचा समावेश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.