फेसबुक वर फेक प्रोफाइल तयार करून त्याद्वारे पैसे मागण्याचे प्रकार वाढू लागले असून अश्यावर सायबर पोलिसांनी नियंत्रण आणावे अशी मागणी करण्यात येत आहे.
बेळगावातील प्रसिद्ध वकील संग्राम कुलकर्णी यांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट तयार करून त्या द्वारे त्यांच्या संपर्कातील लोकांकडून पैश्याची मागणी केली जात आहे.
या प्रकरणी संग्राम कुलकर्णी यांनी बेळगाव सायबर पोलिसांत फिर्याद दाखल केली असून फेसबुक कंपनीला देखील रिपोर्ट करण्यात आला आहे.
आपल्या नावाने खोटी आय डी तयार करून त्याद्वारे माझ्या संपर्कातील लोकांकडून पैसे मागितले जात आहेत असे तक्रारीत नमूद केलं आहे.फेसबुक वरील आवाहनाला बळी पडून कुणीही पैसे देऊ नयेत असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहेत.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी बेळगावातील एका बड्या पोलीस अधिकाऱ्याचे फेसबुक अकाउंट हॅक करून पैश्याची मागणी केली जात होती त्या अगोदर एका माजी नगरसेवकाचे देखील अकाउंट हॅक झाले होते.
अश्या घटना वाढत असताना सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यानी सावधानता बाळगली पाहिजे सायबर पोलिसांनी फेसबुक कंपनीने देखील यावर नियंत्रण आणले पाहिजे अशी मागणी केली जात आहे.