कर्नाटक राज्यात भाजप सरकारला बळकट बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे,जलसंपदा मंत्री आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या एका सीडी ने कर्नाटकच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे.नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी मंत्री रमेश जारकीहोळीं यांची ती सीडी जाहीर केली आहे.
नोकरीच्या निमित्ताने रमेश जारकीहोळी यांनी एका युवतीवर अत्याचार केला आहे. तिच्या कुटुंबीयांनी माझ्याशी संपर्क साधून तक्रार नोंदविण्याची विनंती केली होती,अशी माहिती दिनेश कलहळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.त्याचबरोबर दिनेश कलहळी यांनी बेंगळुरू पोलिस आयुक्तांकडे मंत्र्यांविरूद्ध चौकशी करण्याची मागणी केली आहे.
रमेश जारकीहोळी आज म्हैसूर येथे एका लग्न समारंभाला उपस्थित झाले होते. मात्र सिडी प्रकरणाची माहिती प्रसिद्ध झाल्याचे त्यांना कळताच जारकीहोळी मैसूर येथून तात्काळ निघून गेले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्याशी संपर्क साधता येत नसल्याची माहिती पुढे येत होती.
राज्यातील काँग्रेस-निजद युती सरकार कोसळणवीण्यात रमेश जारकीहोळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता,रमेश जारकीहोळी यांच्या त्या सीडी मुळे कर्नाटकातील विरोधी पक्ष आक्रमक होऊन भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार असे संकेत मिळू लागले आहे.