Sunday, May 5, 2024

/

बेळगाव दौऱ्यावर आलेले डीकेशी काय म्हणाले? वाचा बेळगाव लाईव्ह….

 belgaum

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे कर्नाटक राज्याध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांबरा विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. सोमवारी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतीश जारकीहोळी हे निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस पक्षाचा उमेदवार निश्चित बहुसंख्य मतांनी निवडून येईल, असा विश्वास डीकेशींनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले कि, लोकसभेत काँग्रेसचा उमेदवार आम्ही नक्कीच पाठवणार आहोत. अफाट इच्छाशक्तीच्या जोरावर जनता नक्कीच काँग्रेसला विजय मिळवून देईल. ‘भाजपचे अपयश हेच काँग्रेसचे यश’ असल्याचे सांगत भाजप सरकारवर त्यांनी कडाडून टीका केली. वाढते पेट्रोलचे दर, गॅसचे वाढीव दर, कोविड परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश, खोटी आश्वासने, भ्रष्टाचार या साऱ्यांना जनता कंटाळली आहे. बेरोजगार युवक रोजगाराची मागणी करत आहेत. त्यांना पकोडे टाळण्यासाठी सांगितले जात आहे. अशा पद्धतीने त्यांनी केंद्र सरकारची खिल्ली उडविली. हि सर्व परिस्थिती पाहता जनता भाजपाला नाही तर काँग्रेसला नक्कीच मत देऊन विजयी करेल, असे मत डीकेशींनी व्यक्त केले.

सांबरा विमानतळावर आलेल्या डीकेशींना रमेश जारकीहोळी समर्थकांनी काळे झेंडे दाखविले. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यासंदर्भात बोलताना डीकेशी म्हणाले त्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे, यासाठी त्यांचे समर्थ माझा अशापद्धतीने स्वागत करत आहेत, याचा मला आनंद आहे, अशा शब्दात त्यांनी रमेश जारकीहोळी समर्थकांची हसत हसत खिल्ली उडविली.

 belgaum

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडण्यात आलेले सतीश जारकीहोळी हे नेहमीच जनतेची सेवा करतात, त्यांची काळजी घेतात. जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी पक्ष कमजोर ठरला आहे. त्यामुळे सतीश जारकीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचे डीकेशींनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.