Sunday, December 29, 2024

/

मराठी जनतेला तडफदार नेतृत्वाची गरज

 belgaum

सीमाभागातील मराठी जनता स्वातंत्र्योत्तर काळातदेखील कर्नाटकी अत्याचाराच्या आणि गुलामगिरीच्या दडपणात जगत आहे. संविधानाने दिलेल्या अधिकार आणि हक्कांपासून वंचित आहे. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विवधात आवाज उठविणारी महाराष्ट्र एकीकरण समिती गट- तटाच्या राजकारणात गुरफटली आहे. अशावेळी मराठी माणसाच्या न्यायासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे.

येत्या १७ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मराठी भाषिकांच्या नेतृत्वाने खंबीरपणे निवडणूक लढवावे, अशी मागणी मराठी भाषिक जनतेतून करण्यात येत आहे. सध्या सीमाभागातील परिस्थिती स्फोटक बनली आहे. महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेल्या लाल – पिवळ्या झेंड्याच्या प्रकरणानंतर सातत्याने सीमाभागात तणावपूर्ण वातावरण आहे. मणगुत्ती येथील शिवमूर्ती प्रकरण, पिरनवाडी येथील शिवमूर्ती प्रकरण, वेदिकेची सुरु असलेली कर्नाटकी ढोंगबाजी, मराठी नामफलकासोबत होत असलेली छेडछाड, मराठी द्वेषाने उफाळून आलेल्या कन्नड संघटनांचा थयथयाट, शिवसेना वाहनावर झालेल्या भ्याड हल्ला या सर्व घटनांनंतर मराठी भाषिकांच्यात रोष आहे त्यामुळे पोट निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना मतदान करण्या ऐवजी स्वतःचा मराठी भाषिक उमेदवार उभा केला जावा अशी मागणी वाढू लागली आहे.

बेळगावात गेल्या वर्ष भरात युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी आपल्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलन यशस्वी केली आहेत त्यामुळे युवकात शुभम यांना लोकसभा उमेदवारी ध्यावी अशी मागणी वाढू लागली आहे.Shubham mes

पोट निवडणुकीसाठी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नावाची जोरदार चर्चा सीमाभागात सुरु आहे. शुभम शेळके यांनी सातत्याने कोणत्याही परिणामांची पर्वा न करता मराठी भाषिकांच्या बाजूने उभे राहून आवाज उठविला आहे. विविध आंदोलने, प्रशासनाची दडपशाही, वेदिकेचा थयथयाट यासोबत माजी आमदाराची कानउघाडणी आणि बिनधास्तपणे कोणालाही जाब विचारण्याची धमक शुभम शेळके यांनी वेळोवेळी दाखविली आहे. त्यांच्या या वेगळ्या अंदाजाला सीमाभागातील मराठी तरुणांची पसंती आहे. त्यामुळे आगामी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शुभम शेळके यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

बेळगावमधील मराठी भाषिकांच्या बाजूने उभं राहण्यासाठी सध्या एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांची नावे लवकरच घोषित होतील. परंतु मराठी भाषिक जनतेचे नेतृत्व करण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे. शुभम शेळके यांच्या सारख्या नेतृत्वाची मराठी भाषिकांना खरी गरज आहे. आगामी काळात मराठी भाषिक जनतेसाठी कोणते नेतृत्व लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पुढे येईल, याकडे साऱ्या मराठी भाषिक जनतेचे लक्ष आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.