Thursday, December 19, 2024

/

महिला कॉन्स्टेबलची गळफास लावून आत्महत्या

 belgaum

पतीच्या जाचाला कंटाळवून सांबरा येथील महिला कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सांबरा विमान तळावर कार्यरत असणाऱ्या कर्नाटक औद्योगिक सुरक्षा दलातील महिला कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सुजाता बसाप्पा करेन्नावर असे आत्महत्या केलेल्या कॉन्स्टेबलचे नाव असून सदर महिला कर्नाटक औद्योगिक सुरक्षा दलाच्या माध्यमातून सांबरा विमानतळावर सेवा बजावीत होती.

पती हणमंतगौड मडिगेपगौड पाटील याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मूळच्या रामदुर्ग तालुक्यातील हंपीहोळी या गावातील आणि सध्या सांबरा येथे वास्तव्यास असणाऱ्या या महिला कॉन्स्टेबलने सांबरा येथे फाशी घेऊन आत्महत्या केली आहे.

मृत महिला कॉन्स्टेबलचा पती हा पंतनगर येथील खाजगी शाळेत शिक्षक पदावर कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेच्या पतीविरद्ध भादंवि कलम ३०६ आणि ४९८ अन्वये मारिहाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.