बदलत्या तंत्रज्ञानाचे जितके फायदे आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक तोटे आहेत. सध्या प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन आहे. आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्मार्टफोनमध्ये वॉट्सप आहेच.
व्हॉट्सअप आणि अशा अनेक सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत. बेळगावमधील अशाच एका वॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ग्रुपचा वापर सत्कारणी लावण्यात आला आहे.
‘मैत्री कट्टा’ या नावाने असणाऱ्या या व्हॉट्सअप ग्रुपला आज ६ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने ग्रुपमधील सदस्यांच्या वतीने कलखांब येथील सिद्धेश्वर गोशाळा, मराठी कॉलनी येथे एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रत्येक वर्षी असे उपक्रम या व्हॉट्सअप ग्रुप सदस्यांच्या माध्यमातून राबविले जातात. आज सिद्धेश्वर गोशाळेला भेट देऊन सदस्यांच्या वतीने गुल, केली आणि पशुखाद्याचे वितरण करण्यात आले.
गोशाळा प्रमुख हिरामणी मुचंडीकर यांच्याकडे साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी मैत्री कट्टा ग्रुपचे पै.अतुल शिरोले, अमित अस्वले,रोहित कुंडेकर,विक्रम नागेनटी,महेश गुंजीकर,अक्षय साळुंखे, अजय धामोने, सम्राट जाधव,नागेश भातकांडे, सिध्दार्थ आदी उपस्थित होते.