घरात झालेल्या भांडणामुळे तीन दिवसापूर्वी रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या एका महिलेने आपल्या दोन लहान मुलींसह घटप्रभा नदीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली आहे.
आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव सावित्री राजू बनाज (वय 30, रा. अरभावी, ता. गोकाक) असे असून तिच्या मृत मुलींची नावे पूजा (वय 3) आणि लक्ष्मी (वय 2) अशी आहेत.
घरात झालेल्या भांडणानंतर सावित्री आपल्या दोन मुलींना घेऊन घरातून निघून गेली होती.
रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या सावित्रीसह तिच्या मुलींचा तीन दिवस शोधाशोध करून देखील पत्ता लागला नव्हता. त्यानंतर आज रविवारी सकाळी त्या तिघांचे मृतदेह घटप्रभा नदीमध्ये तरंगताना आढळून आले याप्रकरणी गोकाक शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.