बेळगाव शहराचा समावेश स्मार्ट सिटी मध्ये करण्यात आला आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून या ठिकाणी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत तसेच रस्ते गटारी आणि इतर समस्या सोडवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
मात्र हे सारे प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत. विविध ठिकाणी रस्ते करण्यात आले आहेत. मात्र त्याची पुनर खोदाई करून अनेकांना त्रास देण्यात धन्यता मानतात येत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीला खोदायचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.
विकासाचे पाऊल भकासाकडेच सुरू असल्याचे हे चित्र शहरवासीयांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे एखादा रस्ता केला किंवा गटार केली ती योग्य व चांगल्या पद्धतीने केल्यास त्याचा दुरुपयोग होणार नाही असेही सांगण्यात येत आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देणार कोण स्मार्ट सिटी अधिकारी आपल्या टक्केवारीवर आणि काही लोकप्रतिनिधी आपल्या कमिशनवर अडकून पडले आहेत. अनेक कंत्राटदारांना त्रास देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे अनेक कामे रेंगाळत असल्याचे दिसून येत आहेत.
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत अनेक ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी अर्धवट रस्ते आणि खोदाई करून ठेवण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये अपघातही वाढत असल्याचे दिसून येत आहे. याकडे गांभीर्याने कोण लक्ष देणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. परिणामी ही समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
याचबरोबर लोकप्रतिनिधींनीही याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. तेव्हा खोदाई कमी आणि कामावर अधिक लक्ष दिल्यास ही समस्या मिटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होत आहे.