Tuesday, January 7, 2025

/

दादरहून तिरूनेलवेली, पांडेचेरी, म्हैसूरसाठी 3 खास रेल्वे गाड्या

 belgaum

निवृत्त रेल्वेने दादर मुंबई येथून तिरूनेलवेली पांडेचेरी आणि मैसूर साठी तीन खास रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त रेल्वेगाड्यांची माहिती खालील प्रमाणे आहे.

रेल्वे क्रमांक 01021 /01022 दादर -तिरूनेलवेली -दादर त्री -साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल : रेल्वे क्र. 01021 दादर ते तिरूनेलवेली त्री -साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल रेल्वे दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी रात्री 9:30 वाजता दादरहून प्रस्थान करेल आणि तिरूनेलवेली येथे अनुक्रमे गुरुवार, शुक्रवार आणि सोमवारी सकाळी 11:40 वाजता पोहोचेल. सदर रेल्वे येत्या 27 फेब्रुवारी 2021 पासून प्रारंभ होणार असून पुढील आदेशापर्यंत ती सुरू राहणार आहे. प्रवासाच्या मार्गावर ही रेल्वे कल्याण, कर्जत, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज, कुडची, घटप्रभा येथे थांबे घेऊन सकाळी 9 वाजता बेळगावला पोहोचून 9:05 वाजता प्रस्थान करेल. पुढे लोंढा, अळणावर, धारवाड, हुबळी असे थांबे घेत ही रेल्वे तिरूनेलवेली येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक 01022 तिरूनेलवेली ते दादर त्री -साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल रेल्वे तिरूनेलवेली येथून दर गुरूवार, शुक्रवार आणि सोमवारी दुपारी 3 वाजता प्रस्थान करेल आणि अनुक्रमे शनिवार, रविवार आणि बुधवारी पहाटे 5:30 वाजता दादरला पोहोचेल. परतीच्या प्रवासाची ही रेल्वे येत्या 1 मार्च 2021 पासून प्रारंभ होऊन पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार आहे. सदर रेल्वेचे बेळगाव रेल्वे स्थानकावर सायंकाळी 5:45 वाजता आगमन आणि 5:50 वाजता प्रस्थान होईल. सदर रेल्वे कल्याण (मुंबई) येथे तिसऱ्या दिवशी पहाटे 04:37 वाजता पोहोचून 04:40 दादरला प्रस्थान करेल. सदर रेल्वेला 17 कोचेस (डबे) असणार असून त्यामध्ये एक एसी -2 टायर कोच, तीन एसी 3 -टायर कोचेस, 8 सेकंड क्लास स्लीपर कोचेस, 3 जनरल सेकंड क्लास कोचेस आणि दिव्यांग कोचसह दोन सेकंड क्लास लगेज कम ब्रेकव्हॅन यांचा समावेश असणार आहे.

रेल्वे क्र. 01005 दादर ते पांडेचेरी त्री -साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल रेल्वे दादर येथून दर सोमवार, शुक्रवार आणि रविवारी रात्री 9:30 वाजता सुटेल आणि पांडेचेरी येथे अनुक्रमे बुधवार, रविवार आणि मंगळवारी सकाळी 7:10 वाजता पोहोचेल. सदर रेल्वे येत्या 26 फेब्रुवारी 2019 पासून प्रारंभ होणार असून पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार आहे. प्रवासाच्या मार्गावर दादर ते तिरूनेलवेली रेल्वे प्रमाणे थांबे घेत या रेल्वेचे बेळगाव रेल्वे स्थानकावर सकाळी 9 वाजता आगमन आणि 9:05 वाजता प्रस्थान होईल. खानापूर व लोंढा येथे थांबे घेणारी ही रेल्वे तिसऱ्या दिवशी सकाळी 06:13 वाजता विल्लूपुराला पोचून पुढे पांडेचेरीला प्रस्थान करेल. परतीच्या प्रवासात रेल्वे क्र. 01006 पांडेचेरी ते दादर त्री -साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल रेल्वे पांडेचेरी येथून दर बुधवार, रविवार आणि मंगळवारी रात्री 09:25 वाजता प्रस्थान करेल आणि दादर येथे अनुक्रमे शुक्रवार, मंगळवार आणि गुरुवारी पहाटे 5:30 वाजता पोहोचेल ही रेल्वे येत्या 28 फेब्रुवारी रोजी प्रारंभ होऊन पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार आहे. सदर रेल्वे बेळगाव रेल्वे स्थानकावर तिसऱ्या दिवशी सायंकाळी 5:45 वाजता पोहोचून 5:50 वाजता दादर मुंबईकडे प्रस्थान करेल. सदर रेल्वेला 17 कोचेस (डबे) असणार असून त्यामध्ये एक एसी -2 टायर कोच, तीन एसी 3 -टायर कोचेस, 8 सेकंड क्लास स्लीपर कोचेस, 3 जनरल सेकंड क्लास कोचेस आणि दिव्यांग कोचसह दोन सेकंड क्लास लगेज कम ब्रेकव्हॅन यांचा समावेश असणार आहे.

रेल्वे क्र. 01035 /01036 दादर -म्हैसूर -दादर साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल : रेल्वे क्र. 01035 दादर ते म्हैसूर साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल रेल्वे दर गुरुवारी रात्री 9:30 वाजता दादर येथून प्रस्थान करून दुसर्‍या दिवशी रात्री 09:40 वाजता म्हैसूरला पोहोचेल. सदर रेल्वे येत्या 25 फेब्रुवारी 2021 पासून प्रारंभ होऊन पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार आहे. प्रवासाच्या मार्गावर कल्याण, कर्जत, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज, कुडची, घटप्रभा येथे थांबे घेत या रेल्वेचे बेळगाव रेल्वे स्थानकावर सकाळी 9:00 वाजता आगमन आणि 9:05 वा. प्रस्थान होईल. सदर रेल्वे कृष्णराजनगर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 07:19 वा. पोचून 07:20 वाजता म्हैसूरकडे प्रस्थान करेल. परतीच्या प्रवासात रेल्वे क्र. 01036 म्हैसूर ते दादर साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल रेल्वे म्हैसूर येथून दर रविवारी सकाळी 6:15 वाजता प्रस्थान करेल आणि दादर मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता पोहोचेल. सदर रेल्वे 28 फेब्रुवारी 2021 पासून प्रारंभ होऊन पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार आहे. बेळगाव रेल्वे स्थानकावर या रेल्वेचे सायंकाळी 5:45 वाजता आगमन आणि 5:50 वाजता प्रस्थान होईल. कल्याण (मुंबई) येथे दुसर्‍या दिवशी पहाटे 04:37 वा. पोहचून 04:40 वा. ही रेल्वे दादरला रवाना होईल. सदर रेल्वेला 17 कोचेस (डबे) असणार असून त्यामध्ये एक एसी -2 टायर कोच, तीन एसी 3 -टायर कोचेस, 8 सेकंड क्लास स्लीपर कोचेस, 3 जनरल सेकंड क्लास कोचेस आणि दिव्यांग कोचसह दोन सेकंड क्लास लगेज कम ब्रेकव्हॅन यांचा समावेश असणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.