सीमाप्रश्न आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा असून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक नेता सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारी मध्ये झालेल्या हुतात्मा दिनी सीमाभाग महाराष्ट्रात आणण्याचा निर्धार केला असून आता त्यापाठोपाठ दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सीमाप्रश्नी मुद्दा मांडला असून, सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालय जोवर सुनावणी करत नाही, तोवर हा भाग केंद्रशासित करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद अनेक वर्षांपासून सुरु आहे. महाराष्ट्राने कर्नाटकातील ७००० वर्ग किलोमीटर व्याप्तीचा भूभाग महाराष्ट्रात सामील करण्याचा दावा केला आहे. यामध्ये, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह १४ मराठी गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे मुख्य स्वरूपात मराठी भाषिकांची आहेत. या भागात बहुसंख्येने मराठी भाषिक राहतात. या भागात राहणाऱ्या प्रत्येक मराठी भाषिकांची सीमाभाग महाराष्ट्रात सामील करण्याची इच्छा आहे. १९५६ साली झालेल्या भाषावार प्रांतरचनेत अन्यायाने हा भाग कर्नाटकात डांबण्यात आला आहे.
१९४८ साली अस्तित्वात आलेल्या महानगरपालिका सभागृहात मराठी बहुल भाषिक भाग हा महाराष्ट्रात सामील करण्याची विनंती केली. ५० टक्क्यांहून अधिक कन्नड भाषिक असणारा भाग म्हैसूरमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. तसेच मराठी भाषिक असणारे जिल्हे महाराष्ट्रात सामील करावेत, १९५६ साली झालेल्या भाषावार प्रांतरचनेत बेळगावसह इतर तालुके हे तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आले. १९७३ मध्ये कर्नाटक राज्याची स्थापना झाल्यानंतर हे सर्व भाग कर्नाटकात डांबण्यात आले. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अनेक वर्षांपासून याचिका दाखल आहे. २०१७ मार्च २०२० रोजी या याचिकेवर सुनावणी होणार होती.
परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे ही सुनावणी झाली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. विविध कारणांमुळे २३ जानेवारी २०१७ नंतर कोणतीही सुनावणी या याचिकेवर झाली नाही. जोरावर सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्न प्रलंबित आहे, तोवर हा संपूर्ण सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांची लोकसभेत मागणी-सीमाभाग केंद्र शासित करा
https://www.facebook.com/375504746140458/posts/1324767997880790/