खिडकी तोडून घरात प्रवेश केलेल्या सात दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवून दीड लाखांचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली.
तोंडावर मास्क परिधान केलेल्या अज्ञात सात जणांनी तिसरा रेल्वे फाटक ते राणा प्रताप रोड वरील घरात शिरून मोठा दरोडा घालण्याचा प्रयत्न केला, 35 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तिसऱ्या रेल्वे गेट जवळील अभिजित सामंत यांच्या घरी हा प्रकार घडला असून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे.उद्यमबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडा घालण्याच्या हेतूने गुरुवारी पहाटे सामंत यांच्या घरच्या खिडकीचे गज तोडून सात जणांनी प्रवेश केला त्यावेळी सामंत आणि त्यांची पत्नी घरात झोपले होते.
त्यावेळी चोरट्यांनी बेडरूम मधील लॉकरची चावी शोधली पण त्यांना ती. मिळाली नाही दरोडेखोरानी चाकूचा धाक दाखवून कपाटाच्या चावीची मागणी केली. सोन्याची अंगठी,कर्णफुले आणि महिलेच्या गळ्यातील गंठन असे एक लाख 65 हजार किमतीचे 35 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले.
दरोडेखोर इंग्लिश आणि हिंदीतून संभाषण करत होते.ते सात जण होते घरची खिडकी तोडून त्यांनी घरात प्रवेश मिळवला होता.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दयानंद शेगुनशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि ठसे तज्ञाना पाचारण करून पंचनामा केला .खडे बाजार ए सी पी चंद्रप्पा यांनी देखील भेट दिली.
दरोडेखोर घरात शिरल्याचे कळताच सामंत कुटुंबीयांने संयम पाळून त्यांचा धाडसाने मुकाबला केला.अभिजित यांनी एका चोरट्यांला लाथ घातली त्यांच्या सोबत त्यांची झटापट देखील झाली अशी माहिती उपलब्ध झाली आहे.