Saturday, May 4, 2024

/

आरसीयु : सेमिस्टर परीक्षेचे तत्कालीन वेळापत्रक जाहीर

 belgaum

राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत (आरसीयु) येणाऱ्या महाविद्यालयातील पदवीच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या सेमिस्टर परीक्षेसाठी अर्ज भरणे सुरू झाले असून पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षेचे तत्कालीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

यंदा पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षा 15 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी आपले परीक्षा अर्ज स्टुडंट पोर्टलच्या माध्यमातून भरावयाचे आहेत. गेल्या 1 फेब्रुवारीपासून अर्ज भरणा प्रक्रिया सुरू झाली असून 8 फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर 9 ते 12 फेब्रुवारीपर्यंत रोज 100 रुपये दंडात्मक रक्कम भरून अर्ज भरता येणार आहेत. पाचव्या सेमिस्टर साठी प्रॅक्टिकल परीक्षा 1 मार्चला जाहीर केली जाणार आहे.

स्टुडंट पोर्टलवर 11 मार्चपर्यंत परीक्षा प्रवेश पत्र खुले करण्यात येईल. त्यानंतर 12 मार्चपर्यंत इंटरनल मार्क सबमिशन होणार आहे. विद्यापीठाकडून महाविद्यालयांना 13 व 14 मार्च रोजी परीक्षेची कागदपत्रे दिली जाणार आहेत असून 15 मार्च नंतर अंतिम परीक्षा आणि 22 मार्च ते 28 एप्रिल दरम्यान पेपर तपासणी होईल.

 belgaum

या पेपर तपासणीनंतर 8 ते 24 एप्रिल दरम्यान पहिल्या व तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहे. त्यानंतर अंतिम परीक्षा व पेपर तपासणी केली जाणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.