Friday, May 3, 2024

/

पक्षाने परवानगी दिली तर गोकाकमधून नक्की निवडणूक लढविणार

 belgaum

गोकाकमधील जनता स्वतः आपल्याला गोकाक मतदार संघात येण्याचे आवाहन करत आहे. पक्षश्रेष्टींनीं परवानगी दिली तर आपण नक्की गोकाकमध्ये जाऊन निवडणूक लढवू, असे स्पष्टीकरण ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले आहे.

शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली असून, गोकाक मतदार संघातून निवडणूक लढविण्याबाबत पक्षाच्या आदेशाचे पालन करेन, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात गोकाकमधील जनता आपल्याला बोलवत असून आपण बंगळूरमध्ये असताना गोकाकमधील काही लोकांनी आपल्या मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे आवाहन केले असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकरांनी सांगितले.

मी ग्रामीण मतदार संघातील महिला आहे. अजून ग्रामीण मतदार संघात बरीच विकासकामे करायची आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी भरपूर अनुदान मंजूर करून घेण्यात आले आहे. रात्रंदिवस आपल्या कुटुंबासमवेत विकासकामे राबवित आहे. पक्ष कोणता निर्णय घेईल, त्या निर्णयाशी आपण वचनबद्ध असल्याचेही हेब्बाळकरांनी सांगितले.

 belgaum

काँग्रेस पक्षाने, कार्याध्यक्षांनी आणि माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी आपल्यावर संपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. माजी महिला युनिट अध्यक्ष, बेळगाव जिल्हा काँग्रेस प्रवक्त्या या नात्याने जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदारांच्या विजयाची जबाबदारी माझी आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीबाबत पक्ष आणि हायकमांडच्या निर्णयाशी आपण कटिबद्ध आहोत, अशी प्रतिक्रिया आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली.

जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे नेहमीच आपल्याबाबतीत उलट सुलट मत नोंदवत असतात. एक मंत्री असूनही पीडीओपर्यंत जाऊन राजकारण करण्याची काहीच गरज नाही. धारवाड मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठविण्याची गरज आहे, किंवा अशी अनेक विधाने करणाऱ्या जारकीहोळींना अशी विधाने शोभत नसल्याची टीकाही आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. मीही रामभक्त आहे. राममंदिर उभारणीसाठी मी स्वतः वैयक्तिक स्वरूपात दोन लाखांची देणगी दिली आहे.

राम मंदिर उभारणीची स्वप्न पाहणाऱ्या अनेक जनतेपैकी मीदेखील आहे. प्रभू श्रीरामांचा पक्ष म्हणून मिरवत असलेल्या भाजपमध्ये माझ्यासारख्या महिलेवर अशापद्धतीने प्रतिक्रिया देण्यात येत आहेत, आणि जनता हे सर्व पहात आहे. जारकीहोळी नेहमीच उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त करत असतात, त्यांच्या अशा प्रतिक्रियांना आणि वक्तव्यांना इतके महत्व देण्याची गरज नाही. असे मत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.