Friday, May 3, 2024

/

खुनाच्या आरोपातील फरारी आरोपीला अटक

 belgaum

बैलहोंगल परिसरात बार समोर एका व्यक्तीचा खून करून फरारी असलेल्या आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. खून प्रकरणी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

बैलहोंगल पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत २४ फेब्रुवारी रोजी शशिकांत मिरजकर या व्यक्तीचा खून करण्यात आला होता. बैलहोंगल परिसरात असलेल्या संस्कृत बारसमोरील खुल्या जागेत सदर व्यक्तीचा मृतदेह चेहऱ्यावर प्लास्टिक गुंडाळलेल्या अवस्थेत दिसून आला. याप्रकरणी मृत शशिकांत मिरजकर याच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणी बैलहोंगल पोलिसांनी अधिक तपास करत अवघ्या २४ तासात खुनी आरोपीचा शोध लावला आहे. अक्षय चंद्रकांत मिरजकर (वय ३२, रा. विनायक नगर, बैलहोंगल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 belgaum

बैलहोंगल डीवायएसपी शिवानंद कटगी, बैलहोंगल पोलीस स्थानकाचे सीपीआय यु. एच. सातेनहळ्ळी, पीएसआय इराप्पा रिती यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हा खून नेमका कशासाठी करण्यात आला, यासंबंधी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे वरिष्ठ पोलिसांकडून कौतुक करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.