Saturday, May 4, 2024

/

ब्रेकिंग न्यूज निर्णय बदलला-मोहनगा यात्रा गावमर्यादित

 belgaum

मोहनगा दड्डी येथील श्री भावेश्वरी देवीची यात्रा कोरोना पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या काळात रद्द करण्यात आली होती. यमकनमर्डी मतदार संघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून हि यात्रा पुन्हा भरवण्याचे ठरविण्यात आले. परंतु कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या मार्गावर असून खबरदारीसाठी हि यात्रा पुन्हा गावमर्यादित आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे.

आज रविवारी सकाळी सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत झालेल्या देवस्थान पंच कमिटी सदस्य, ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून हि यात्रा केवळ गावमर्यादित करण्याचे ठरविण्यात आले आहे.Daddi mohanga

या देवस्थानात कर्नाटकासह गोवा आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. परंतु सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत असून या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.Mohanaga

 belgaum

गावकऱ्यांच्या या निर्णयाचे सतीश जारकीहोळी यांनी स्वागत केले आहे. बैठकीला उपस्थित असलेल्या आमदार सतीश जारकीहोळी यांचा ग्रामस्थांच्या आणि देवस्थान समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या बैठकीला पाटील ट्रस्ट कमिटीचे भाऊराव विष्णू पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत सिद्धू पाटील, सेक्रेटरी संतराम विठोबा पाटील, देवस्थान ट्रस्ट सदस्य भागोजी पाटील, ट्रस्टी अशोक तुकाराम पाटील, मारुती भरमू पाटील, सलामवाडी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष शरद पाटील, अमोल दळवी, दयानंद पाटील, जगन्नाथ गुरव, अण्णा कोकितकर, महादेव कोकितकर, दीपक बागडी आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.