दगडाने भरलेल्या डंपरने मागून धडक दिल्यामुळे एका ॲक्टीव्हा चालक महिलेचा उजवा पाय पूर्णपणे निकामी होऊन ती गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील कोल्हापूर सर्कल येथे आज दुपारी घडली.
अपघातग्रस्त महिला सुमारे 28 ते 30 वर्षे वयाची असून ती आपल्या दोन लहान मुलांसमवेत ॲक्टीव्हावरून निघाली होती.
कोल्हापूर सर्कल येथे सिग्नलच्या ठिकाणी मागून येणाऱ्या दगडाने भरलेल्या डंपरच्या मागील चाकाखाली सापडल्याने त्या महिलेचा उजवा पाय जांघेपासून पूर्णपणे तुटला असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. सदर अपघातात ॲक्टीव्हावरील मुलांना सुदैवाने किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात आले.
बातमीचा अन्य तपशील थोड्या वेळातच…