हरिप्रिया एक्सप्रेस पुनश्च सुरू : आज दुपारी बेळगावात दाखल

0
4
Bgm railway station
 belgaum

लॉक डाऊननंतर तब्बल दहा महिन्यांनी तिरूपती -कोल्हापूर या मार्गावर धावणारी हरिप्रिया एक्सप्रेस रेल्वे काल सोमवारपासून पुनश्च प्रारंभ झाली आहे. काल तिरुपती येथून निघालेली हरिप्रिया एक्सप्रेस आज मंगळवारी दुपारी 12:21 वाजता बेळगावात दाखल होणार आहे.

कोरोना प्रादुर्भाव निवळल्यानंतर कांही मोजक्‍याच रेल्वे बेळगाव रेल्वे स्थानकावरून धावत होत्या. त्यामध्ये आता हळूहळू वाढ होत आहे.

चन्नम्मा एक्सप्रेस सुरू केल्यानंतर दक्षिण -मध्य रेल्वेने तिरूपती -कोल्हापूर हरिप्रिया एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला. या रेल्वेला नेहमी चांगले बुकिंग असल्यामुळे ही रेल्वे सुरू झाल्यास उत्तम महसूल जमा होण्याची शक्यता असल्यामुळे रेल्वे विभागाने ही रेल्वे पुनश्च सुरू केली आहे.

 belgaum

हरिप्रिया एक्सप्रेस सुरु झाल्यामुळे अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा बेळगावच्या भाविकांना तिरुपती येथील बालाजीच्या दर्शनाला जाता येणार आहे. हरिप्रिया एक्सप्रेस तिरुपती ते कोल्हापूर या मार्गावर धावत असल्यामुळे बेळगावमधून मिरजला जाणाऱ्या प्रवाशांना ही आणखीन एक रेल्वे उपलब्ध होणार आहे.

मिरजेच्या दिशेने जाण्यासाठी दुपारच्या सत्रात या पद्धतीने चांगली सोय होणार आहे. त्याचप्रमाणे दुपारी मिरजेहून बेळगावला येण्यासाठी देखील हरिप्रिया एक्सप्रेस रेल्वेचा उपयोग होणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.