प्रकल्प खर्चात 100 कोटी रुपयांवरून 185 कोटी रुपये इतकी वाढ झालेली गांधीनगर ते सीबीटीपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज उभारण्याची योजना राज्य सरकारने नामंजूर केल्यामुळे हा प्रकल्प मोडीत निघाला आहे.
गेल्या 2015 साली गांधीनगर ते सीबीटीपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज उभारण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानंतर ही योजना स्मार्ट सिटी लिमिटेडकडे हस्तांतरित करण्यात आली आणि त्यासाठी 100 कोटी रुपयांचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला. परंतु आता या फ्लाय ओव्हर ब्रिज उभारणीचा खर्च 185 कोटी रुपये इतका झाला आहे. परिणामी राज्य सरकारने तो मंजूर केला नसल्यामुळे हा प्रकल्प मोडीत निघाला आहे.
स्मार्ट सिटी लिमिटेडचे संचालक शशिधर कुरेर यांनी स्वतः गांधीनगर ते सीबीटीपर्यंतच्या फ्लाय ओव्हर ब्रिज योजनेला सरकारने मान्यता दिली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द झाला आहे.
सदर फ्लाय ओव्हर ब्रिजचे अशोक सर्कल फ्लाय ओव्हर ब्रिज असे तांत्रिक संबोधन होते. जो हॉटेल संकमपासून सुरू होऊन सीबीटीनजीक समाप्त होणार होता. ले-आऊट अनुसार ब्रिजचा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा बाहेर पडण्याचा एक मार्ग कॅन्टोन्मेंट होलसेल भाजी मार्केट येथे, एक मेटगुड क्लिनिकनजीक आणि एक लेक व्ह्यू हॉस्पिटल येथे होणार होता.