राज्यभरातील विविध रिक्त पदांसाठी घेण्यात येणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका ऐनवेळी फुटल्या होत्या. या प्रकरणात तात्काळ चौकशी आणि तपास करत बऱ्याच आरोपींना अटक देखील करण्यात आली. आता हा आकडा २५ वर गेला असून मुख्य सूत्रधार आरोपींपैकी बेळगावच्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
शिवलिंगाप्पा पाटील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून सदर आरोपी हा बेळगावचा असल्याचे समजते. केंद्रीय गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी सादर माहिती ट्विटद्वारे प्रकाशित केली आहे.
अद्याप या टोळीमध्ये अजूनही आरोपींचा समावेश असून प्रश्नपत्रिका फुट्ल्याप्रकरणातील अधिक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात अधिक तपास करण्यात येत आहे.
शिवलिंग पाटील हा आरोपी स्पर्धात्मक परीक्षा केंद्र चालवत होता. हे केंद्र गेल्या एक वर्षांपासून सदर केंद्र बंद असून त्यानंतरच्या कालावधीत शिवलिंग हा परीक्षार्थींच्या संपर्कात आला. त्यानंतर अशा प्रश्नपत्रिका लाखोंच्या घरात विक्री करण्यात येत होत्या. या प्रकरणात राचप्पा नामक आणखी एका आरोपीही अटक करण्यात आली आहे.