अबकारी निरीक्षक उपविभाग, अन्वेषण विभागाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कणकुंबी चेकपोस्ट रस्त्यालगत वाहन तपासणी करताना एका वाहनात गोवा बनावटीची दारू सापडली आहे. अवैधरित्या वाहतूक करण्यात येणारी मद्यवाहतूक अबकारी खात्याच्यावतीने जप्त करण्यात आली असून संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वाहन क्रमांक एपी २३ टीएफ ८४४८, या वाहनाची तपासणी करतेवेळी केवळ गोवा राज्यात विक्री करण्यासाठी परवाना असलेले गोवा बनावटीचे विविध नमुन्याचे सुमारे ५१३ लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत या वाहनातील ६८४ प्रकारच्या मद्याच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. हे मद्य बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी नेट असल्याची माहिती अबकारी खात्याला मिळाली.
आणि या माहितीनुसार हि कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दिलीपकुमार एम. (वय ३३, रा. एडलापल्ली मंडळ, ता. सुंडूर, जि. गुंटूर, राज्य आंध्रप्रदेश), गुंडाप्पा नेने (वय ४२, रा. अंगलकुदूरू, मंडळ, ता. तेनाली, राज्य आंध्रप्रदेश) या आरोपींना अटक करण्यात आली असून अशोक ले-लँड कंपीनीची सहा चाकी एसी बस जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
सदर कारवाई, डॉ. वाय. मंजुनाथ (अबकारी अपार आयुक्त केंद्र, बेळगाव), जयरामेगौड (अबकारी, उपायुक्त, बेळगाव दक्षिण), चनगौड एस. पाटील (अबकारी उपाधीक्षक, बेळगाव उपविभाग), यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी निरीक्षक मंजुनाथ गलगली यांनी सदर प्रकरण दाखल केले आहे.
तसेच या कारवाईत कणकुंबी अबकारी तपास निरीक्षक एस. एम. पुजारी, बी. ए. पांगेरी, सुनील पाटील, एम. एफ.कटगेन्नवर, बी. एस. अटीगल, ए. आय. सय्यद आणि इतर सहकाऱ्यांनि सहभाग घेतला. या कारवाईत जप्त करण्यात आलेले वाहन आणि मुद्देमाल याची सरासरी किंमत १९,७५,०८० रुपये इतकी आहे.